top of page
Abstract Background

आमच्या विषयी 

प्रिय सदस्य,

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्या., धुळे, आपल्या सभासदांमध्ये स्वावलंबन आणि सहकार्याची तत्त्वे जोपासण्यासाठी समर्पित आहे. याच विचारातून संस्थापक अध्यक्ष कै. आप्पासो दौलतराव राजाराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेची स्थापना झाली.एकत्रित प्रयत्न आणि सहकाराच्या  माध्यमातून समाजसेवेचं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. आपली पतसंस्था शासकीय कर्मचाऱ्यांना बचत आणि स्वावलंबनासाठी प्रोत्साहित करते.


आपल्या सदस्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कर्मचारी वर्गाच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा आणि आवश्यक तंत्रज्ञान यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.


सहकाराच्या या प्रेरणादायी प्रवासात आपल्यासारख्या सदस्यांचा सहभाग हा खूप महत्वाचा आहे. आपल्या विश्वास आणि सहकार्यामुळेच आज आपण ही उन्नती साध्य करू शकलो आहोत.

आपल्या सहकार्यामुळे, आज धुळे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पतसंस्था एक आदर्श ठरली आहे. आपला सहभाग आणि विश्वास हेच आमच्या यशाचे गमक आहे.

आपल्यासोबत या सहकाराच्या प्रवासात पुढे जाण्याचा आणि शाश्वत विकास साधण्याचा आम्हाला विश्वास आहे.

धन्यवाद!

Chairman

सिद्धार्थ वाघ
(सभापती)
कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्या., धुळे

bottom of page